Swapnat Kasav Disane | स्वप्नात कासव दिसणे

Swapnat Kasav Disane हे स्वप्न आपल्यापैकी बहुतेक लोकांना पडले असेल. हिंदू धर्मानुसार कासवाला भगवान विष्णूशी जोडले गेले आहे त्यामुळे लोक कासवाचा खूप आदर करतात. काही जण आपल्या घरात शुभ चिन्ह म्हणून कासव ठेवतात ज्यानेकरून भगवान विष्णूची कृपा आपल्यावर रहावी. त्यामुळे आपल्या समाजात कासवाला फार उत्तम दर्जा आहे आणि त्याला कोणी मारण्याचा देखील प्रयत्न करत नाही. चला तर आपण जाणून घेऊया स्वप्नात कासव दिसणे याचा नेमका अर्थ काय होतो.

Swapnat Kasav Disane शुभ की अशुभ

हिंदू धर्मात कासवाला खूप मान आहे. असे मानतात की ज्याच्या घरी कासव आहे किंवा ज्यांच्या घरी कासवाची मूर्ती आहे त्या घरी भगवान विष्णूचे वर्चस्व नेहमी असते. त्यामुळे त्या घरात सुख, समृद्धी, शांतता कायम राहते. धार्मिक कथांच्या अनुसार हिंदू धर्मात कासवाला भगवान विष्णूंशी जोडले गेले आहे. जेव्हा समुद्रमंथन चालू होते तेव्हा भगवान विष्णूंनी कासवाचे रूप धारण करून समुद्रमंथन केले होते.

स्वप्नात कासव दिसणे हे एका वरदान पेक्षा कमी नाही असे मानले जाते आणि श्रेष्ठ देखील मानले जाते. ज्योतिषशास्त्राच्या अनुसार स्वप्नात कासव दिसणे हा तुम्हाला भविष्यात धनलाभ होण्याचा संकेत असतो. जर तुम्हाला स्वप्नात तुमच्या घरी कासव दिसत असेल तर लवकरच तुमच्या घरी सुख, समृद्धी, आणि शांतता येईल. तसेच हे स्वप्न तुमच्या आयुष्यातील खूप सारे संकट दूर करतील असे संकेत देते.

स्वप्नात कासवाला मारताना किंवा मरताना दिसणे

स्वप्नात कासव मारताना अथवा मरताना दिसत असेल तर हे स्वप्न अशुभ मानले जाते. जर तुम्हाला कासव तुमच्या घरात अन्न खाताना दिसत असेल किंवा तुम्हाला स्वप्नात कासवाचे मांस दिसले तर हे स्वप्न तुमच्यासाठी फार अशुभ मानले जाते. जर तुम्ही व्यवसायिक किंवा व्यापारी असाल तर येणाऱ्या काळात तुम्हाला आर्थिक फटका बसण्याचे संकेत हे स्वप्न देते. आणि तुमच्या हाताखाली काम करणारे लोक तुम्हाला त्रास देतील असा संकेत देते किंवा व्यवसायातील तुमचा जोडीदार तुम्हाला फसवू शकतो. जर तुम्ही कुठे नोकरी करत असाल तर तेथील तुमची मेहनत वाया जाणार आहे असे स्वप्नशास्त्राच्या अनुसार कळते. जर तुम्हाला असे स्वप्न पडले असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मंदिरात असलेल्या कासवाचे पाय पडा आणि माफी मागा.

स्वप्नात कासवाची जोडी पाहणे

स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात कासवांची जोडी पाहणे हे प्रेम दर्शवते. त्यामुळे येणाऱ्या काळात तुमच्या नात्यात गोडवा दिसेल असे हे स्वप्न संकेत देते. जर हे स्वप्न विवाहित स्त्री किंवा पुरुषाला दिसले असेल तर तुमच्या नात्यात गोडवा येऊ शकतो. जर एखादा जोडप्याला संतान प्राप्ती होत नसेल तर त्यांच्यासाठी हे स्वप्न फार लाभकारक असेल त्यांना संतान प्राप्ती होण्याचे संकेत हे स्वप्न देते. जर एखाद्या स्त्रीचा कोणी पुरुष मित्र नसेल किंवा एखाद्या पुरुषाची कोणी स्त्री मैत्री नसेल तर ते लवकरच घडू शकते.

स्वप्नात कासवाला मारणे

कासव हा अतिशय संत गतीने चालणारा प्राणी आहे आणि तो कुणाला त्रास देत नाही त्यामुळे त्याला संरक्षणासाठी देवाने कठीण असे कवच दिले आहे. आपल्याला पृथ्वीवर भरपूर काही खाण्यासाठी आहे परंतु काही लोक कासव देखील खातात. तर तुम्हाला स्वप्नात कासवाला मारताना स्वप्न पडले असेल तर तुमच्या आयुष्यात नकारात्मक गोष्टी घडू शकतात. तुम्ही कितीही श्रीमंत असाल परंतु असे स्वप्न पडले असेल तर तुम्ही दारिद्र्य रेषेखाली जाल असे हे स्वप्न संकेत देते. त्यामुळे तुम्हाला आयुष्यात भरपूर त्रास होऊ शकतो आणि तुम्ही अन्न देखील खरेदी करू शकत नाही. या स्वप्नामुळे तुम्ही तुमचे घर, स्वप्न नाते हे सर्व गमावून बसू शकतात. काही दिवसातच तुमची आर्थिक परिस्थिती खराब होईल

स्वप्नात कासवाची झुंज पाहणे

तुम्हाला जर स्वप्नात दोन कासव एकमेकाशी भांडत करत असताना दिसतील तर हे स्वप्न तुमच्यासाठी अशुभ मानले जाते. हे स्वप्न सांगते की आगामी काळात तुमचे इतर व्यक्तीशी भांडण होऊ शकते. तुमच्या आयुष्यात एखादे आर्थिक संकट देखील घडू शकते त्यामुळे तुम्ही भांडखोर लोकांपासून लांब रहा असे हे स्वप्न संकेत देते. कारण या किरकोळ वादामुळे तुम्हाला तुमची सरकारी नोकरी गमवावी लागू शकते. तुमाला तुमच्या रागावर देखील नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे हे स्वप्न तुमच्यासाठी फार अशुभ आहे हे लक्षात ठेवा.

स्वप्नात कासव चावताना दिसणे

ज्योतिष शास्त्रानुसार स्वप्नात कासव चावताना दिसणे हे अशुभ मानले जाते. हे स्वप्न असे सांगते की लवकरच तुमचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबात फार मोठी संकट येतील. जर तुम्हाला असे स्वप्न पडले असेल तर तुम्ही स्वतःचे निरीक्षण करा आणि तुम्ही कुठे चुकताय याची माहिती घ्या. चूक जर असेल तर ती तुम्ही दुरुस्त करा. अशा स्वप्नानंतर तुम्ही तुमच्या कुलदैवताची पूजा नक्की करा. जेणेकरून तुमच्या आयुष्यातील काही नकारात्मक गोष्टी निघून जातील. तसचे तुम्ही थोडे दान, धर्म देखील केले पाहिजे.

स्वप्नात कासव पकडणे

जर स्वप्नात तुम्ही एखाद्या कासवाला पकडलेले दिसले असेल तर हे स्वप्न अशुभ मानले जाते. हे स्वप्न सांगते की लवकरच तुम्हाला खूप त्रास होणार आहे. ज्यामुळे तुमचे सर्व कार्य अपयशी होईल आणि आधी केले असतील ते देखील. जर स्वप्नात तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला कासव पकडताना बघितले असेल तर हेदेखील अशुभ मानले जाते. तुमच्या जीवनात एखादी अशी व्यक्ती येऊ शकते ज्यामुळे तुमच्या आयुष्याची वाट लागेल. त्यामुळे तुम्हाला तुमची स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.

स्वप्नात कासवाचे अंड दिसणे

स्वप्नात कासवाचे अंड दिसणे हे एक लक्षण आहे, ज्याप्रकारे पक्षी अंडी देतात त्याप्रकारे कासव देखील अंडी देतात. मादी कासव आपले अंड समुद्रा लगदच्या वाळूत आपली अंडी गाडून ठेवते आणि ३ ते ४ महिन्या नंतर त्यातून पिल्ले बाहेर येतात. या स्वप्नामुळे तुम्हाला येणाऱ्या काळात खूप यश मिळेल असे संकेत मिळते. तुम्ही जर व्यवसायिक असाल तर येणाऱ्या दिवसात तुम्हाला फार नफा मिळू शकतो. तुमच्यावरील कर्ज देखील फिटून जाईल. तुम्ही जर नोकरी करत असाल तर त्यात तुम्हाला सर्वांचा सहवास मिळेल आणि तुमची प्रगती होईल. जर हे स्वप्न एखाद्या स्त्रीला पडले असेल तर तिच्या घरी एक छोटा पाहुणा येणार आहे असे संकेत मिळते.

तात्पर्य

स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात कासव दिसणे हे शुभ आणि अशुभ असे दोन्ही प्रकारचे संकेत देते. कासव हे भगवान विष्णूचे अवतार मानले जाते. कासव हा प्राणी अतिशय चांगला असून आपण त्याच्यावर प्रेम केले पाहिजे त्यामुळे आपल्या आयुष्यात यश आणि प्रगती होईल असे या स्वप्नातून आपल्याला कळते.

Share now

Leave a Comment