Swapnat Vihir Disne | स्वप्नात विहीर दिसणे

Swapnat Vihir Disne हे स्वप्न स्वप्नशास्त्रानुसार चांगले मानले जाते. परंतु त्या विहिरीत पाणी साफ आहे की खराब आहे यावरून स्वप्नशास्त्र आपल्याला संकेत देते. विहीर हि आपल्याला गावाखेड्यात पाहायला मिळते. जुनी लोक आपल्या गावात किंवा स्वतःच्या घराजवळ वर्षभर पाणी मिळण्यासाठी त्याचा साठा म्हणून वापर करत असे. तसेच काही लोक शेतीसाठी देखील त्याचा वापर करतात.

काही लोक Swapnat Vihir Disne हे स्वप्न बघून खूप घाबरून जातात की यामुळे आपल्यावर काही वाईट वेळ येणार आहे का असे त्यांना वाटते. परंतु हे स्वप्न आपल्याला का पडतात आणि त्याचे आपल्या जीवनात काय परिणाम होणार आहेत हे जाणून घेणे आवश्यक आहे.

Swapnat Vihir Disne शुभ संकेत

स्वप्नात जर तुम्हाला विहिरीत शुद्ध पाणी दिसत असेल म्हणजे एकदम साफ पाणी दिसत असेल तर हे स्वप्न शुभ मानले जाते. या स्वप्नातून असे समजते की तुम्हाला धन प्राप्ती होणार आहे किंवा तुमच्या जीवनात काहीतरी चांगले घडणार आहे. तुमच्या आरोग्याच्या संबंधीच्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या सर्व निघून जातील आणि तुमच्या जीवनातील साऱ्या अडचणी निघून जातील. त्यामुळे हे स्वप्न जर तुम्ही बघितले असेल तर तुम्ही नशीबवान आहात.

तुम्हाला विहिरीच्या साफ पाण्यात पोहताना स्वप्न दिसत असेल तर हे स्वप्न चांगले मानले जाते. तुमच्या आई-वडिलांनी तुमच्यासाठी एखादी संपत्ती कुठे ठेवली असेल तर ती देखील तुम्हाला मिळू शकते असे स्वप्नशास्त्र सांगते.

Swapnat Vihir Disne अशुभ संकेत

एखाद्या स्वप्नात तुम्ही विहिरीत डोकावून बघत आहात आणि ती विहीर कोरडी दिसत असेल तर स्वप्नशास्त्रानुसार हे स्वप्न अशुभ मानले जाते. या स्वप्नातून असे संकेत मिळते की तुम्हाला आर्थिक टंचाई येईल, बऱ्याच अडचणी येऊ शकतात आणि संकट देखील तुमच्यावर येऊ शकतात. जर स्वप्नात तुम्हाला विहिरीत गढूळ पाणी दिसत असेल तर हे तुमच्या आरोग्याशी संबंधित असू शकते असे स्वप्नशास्त्र सांगते.

एखाद्या स्वप्नात तुम्ही विहिरीत पडत असताना पाहिले असेल तर हे स्वप्न फार अशुभ मानले जाते. विहिरीत बुडत असताना तुम्हाला स्वप्न दिसत असेल तर हे देखील स्वप्न अशुभ असते कारण येणाऱ्या काळात तुमच्यावर संकट येणार आहे असे समजते. तसेच तुम्ही एखाद्या व्यवसायात, नोकरीमध्ये काहीतरी चांगले काम करत आहात तर त्यामध्ये तुम्हाला अडथळे येऊ शकतात असे देखील संकेत या स्वप्नातून मिळते.

तात्पर्य

या स्वप्नातून असे समजते की विहिरीत तुम्हाला साफ अथवा गढूळ पाणी दिसते त्यावरून संकेत मिळतात. हे स्वप्न चांगले आणि वाईट असे दोनी संकेत देतात.

Share now

Leave a Comment