Swapnat Gom Disne हे स्वप्न कित्येक लोकांना पडले असेल. पृथ्वीवर खूप प्रकारचे कीटक आणि किडे आहेत. आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला काही नाही स्वप्न हे पडतच असते त्यामुळे प्रत्येक स्वप्नाचा अर्थ वेगवेगळा असू शकतो. हे स्वप्न आपल्याला का पडतात हे जाणून घेणे आवश्यक्य आहे आणि या स्वप्नाचा आपण भविष्यात येणाऱ्या संकेताचा निर्णय चांगल्यापैकी घेऊ शकतो.
Swapnat Gom Disne याचा स्वप्नशास्त्रानुसार नक्की काय अर्थ आहे हे जाणून घेणे फार गरजेचे आहे. पावसाळ्यात आपल्याला जमिनीवर फिरणारे भरपूर कीटक दिसत असतात त्यापैकी गोम एक कीटक आहे हे स्वप्नात दिसणे शुभ आणि अशुभ असे दोन्ही प्रकारचे संकेत देते. तर आपण जाणून घेऊया या स्वप्नाचा अर्थ नक्की काय असतो ते आपण येथे सविस्तर जाणून घेऊया.
स्वप्नात गोम दिसणे शुभ कि अशुभ
पावसाळ्यात आपल्याला भरपूर प्रकारचे किडे आणि कीटक दिसतात आणि आपल्याला गोम देखील दिसते. जिथे दमटपणा असतो तेथे गोम अधिक आढळतात. आपण एखाद्या गोमला बघितले तर लगेच घाबरून जातो. त्यामुळे आपल्याला ती दिसली तर आपण लगेच तिला मारण्याचा प्रयत्न करतो परंतु स्वप्नात गोम दिसणे याचे शुभ आणि अशुभ हे दोन्ही संकेत शास्त्रात सांगितले गेले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार गोम राहू जातीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे त्याचे चांगले किंवा वाईट असे दोन्ही फळ असू शकतात.
जर तुमच्या देवघरामध्ये गोम आढळली तर हा शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळणार आहे. जर तुमच्या बाथरूम मध्ये किंवा पायऱ्यांवर ती गोम आढळल्यास ते कमकुवत राहूचे लक्षण मानले जाते. तसेच जमिनीवर जिवंत गोम आढळल्यास असे समजावे की हा अशुभ संकेत आहे. यामुळे घराच्या वास्तू वर नकारात्मक परिणाम पडू शकतो त्यामुळे तिला न मारता झटकून घराच्या बाहेर काढावे.
जर तुमच्या घरात एखादी मेलेली गोम आढळली तर घाबरण्याची आवश्यकता नसून हे एक शुभ संकेत मानले जाते. यातून असे समजते की आपल्या घरावर येणारी एखादी मोठी आपत्ती टळली गेली आहे. हे स्वप्न धन लाभ देखील करू शकते.
गोम मारावी की न मारावी
जर तुम्हाला कुठेही गोम दिसली तर तिला न मारता तिला झटकून द्यावे जर तुम्ही तिला मारण्याचा प्रयत्न कराल किंवा मारली असेल तर तुमच्या राहूवर याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या आयुष्यात मोठी अडचण येण्याचा संभव असतो. म्हणून जर गोम तुम्हाला कुठे आढळली तर तिला मारू नका.
तात्पर्य
गोम दिसण्याचे हे काही फायदे आणि काही तोटे देखील आहेत. स्वप्नात गोम दिसणे हे शुभ आणि अशुभ दोन्ही असू शकते त्यामुळे तिला न मारता घराच्या बाहेर फेकून देणे हे योग्य आहे.