Swapnat Kunku Disne हे एक शुभ स्वप्न मानले जाते. कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. देवाच्या मंदिरात देखील आपल्याला हळद आणि कुंकू दिसते त्यामुळे कुंकूचे आपल्या जीवनात फार महत्त्व आहे. लग्न झाल्यानंतर पुरुष आपल्या पत्नीच्या कपाळावर कुंकू लावतात तसेच लग्न होताना मंगळसूत्राच्या दोन वाट्या असतात त्यात देखील हळद-कुंकू चा साठा करतात आणि ते खूप महत्त्वाचे कार्य समजले जाते. महिलांचा हळद कुंकूचा कार्यक्रम असो कि कोणताही कार्यक्रम असो त्यात कुंकू लावणे हि प्रथा असतेच. कुंकू ला हिंदू धर्मात फार महत्व आहे.
Swapnat Kunku Disne शुभ कि अशुभ
तुम्ही जर एखादे काम करत असाल किंवा करण्याचा प्रयत्न करत असाल आणि त्यामध्ये बाधा येत असेल तर ते सर्व आता निघून जाईल असे हे स्वप्न संकेत देते तसेच हे स्वप्न तुम्हाला आयुष्यात एखादे मोठे यश प्राप्त होईल असे देखील संकेत देते. जर स्वप्नात तुम्ही कुंकू खरेदी करताना दिसत असेल तर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल ती लवकरच पूर्ण होईल. स्वप्नात आपल्याला आपण कुंकू लावताना दिसत असेल तर तुम्हाला येणाऱ्या काळात तुमच्या मनासारखे जे पाहिजे ते होईल.
एखादा स्वप्नात आपण देवी देवताला कुंकू लावताना दिसत असेल तर ते स्वप्न फार शुभ मानले जाते तसेच आपण झाडाला देखील कुंकू लावतो ते पण स्वप्न फार चांगले मानले जाते.
Swapnat Kunku Disne अशुभ संकेत
काही महिलांना आपल्या कपाळावर कुंकू लावताना स्वप्न पडते तर हे स्वप्न शास्त्रानुसार अशुभ मानले जाते. हे स्वप्न तुम्हाला एकदा दोनदा पडले असेल तर घाबरून जाऊ नका परंतु जर तुम्हाला हे स्वप्न सारखे पडत असेल तर हे अशुभ मानले जाते. तुम्हाला जर हे स्वप्न सारखे पडत असेल तर तुम्ही देवी पार्वतीला कुंकू अर्पण करा त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात येणारे सर्व अडथळे काही निघून जातील. देवी पार्वतीला तुम्ही कुंकू लावा आणि तिच्या चरणात देखील अर्पण करा.
तात्पर्य
हिंदू धर्मानुसार कुंकू हे महिलांच्या जीवनातील एक सौभाग्याचे प्रतीक मानले जाते त्यामुळे कुंकू ला फार मान आहे. स्वप्नात कुंकू दिसणे हे स्वप्न शुभ मानले जाते आणि त्यामुळे आपले एखादे कार्य पूर्ण होत नसेल तर ते पूर्ण होईल तसेच तुम्हाला जीवनात यश प्राप्त होईल असे संकेत या स्वप्नातून मिळते.