Swapnat Masik Pali Yene हे स्वप्न बघून आपण घाबरून जातो कारण मासिक पाळी हि महिलांच्या जीवनातील एक त्रासदायक गोष्ट आहे आणि ती प्रत्येक स्त्रीला माहित आहे. स्वप्नशास्त्रानुसार या स्वप्नाचा नेमका काय अर्थ आहे किंवा काय संकेत आहेत ते जाणून घेणे गरजेचे आहे. या स्वप्नांचे आपण काहीही तर्क लावतो परंतु असे न करता त्याचे खरे संकेत काय आहेत ते जाणून घेणे आवश्यक आहे.
Swapnat Masik Pali Yene शुभ / अशुभ संकेत
स्वप्नात मासिक पाळी येणे हे स्वप्न असे दर्शवते की तुम्ही एखादया विचारामध्ये किंवा काही गोष्टींच्या टेन्शनमध्ये आहात. ज्याच्याशी आपण लवकर सुटका होण्याचा प्रयत्न करत आहोत पण सुटका होत नाही आहे. अशावेळी आपण त्यातून बाहेर येण्याचा मार्ग शोधला पाहिजे. स्वप्नामध्ये जर तुम्ही मासिक पाळीने भरलेले पॅड अथवा कापड पाहिले असेल तर हे स्वप्न असे सांगते की तुम्हाला तुमच्या जवळील व्यक्तींपासून सावध राहिले पाहिजे, तसेच तुम्हाला लगेच कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवला नाही पाहिजे.
एखादया मुलीने स्वप्नात मासिक पाळी येणे हे स्वप्न पाहिले असेल तर त्यांच्यासाठी हे स्वप्न चांगले फळ देखील देऊ शकते, त्यांना येणाऱ्या काळात त्यांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी लाभेल असे स्वप्नशास्त्र सांगते. परंतु जर एखादया पुरुषाने महिलेला येणारी मासिक पाळी स्वप्नात पाहिली असेल तर याचा अर्थ असा होतो की येणाऱ्या काळात तुम्हाला शुभ बातमी भेटणार आहे. जर तुम्ही विवाहित असाल तर तुमची पत्नी लवकरच गरोदर होईल असे त्याचे संकेत असते आणि जे काही तुम्हाला मानसिक त्रास आहेत ते सर्व निघून जातील असे संकेत मिळते.
गरोदर महिलेला स्वप्नात मासिक पाळी दिसणे
एखादया गरोदर महिलेने हे स्वप्न पाहिले असेल तर असे म्हंटले जाते की तुमची डिलिव्हरी खूप चांगली होईल, तुम्हाला त्यात कोणतीही अडचण येणार नाही त्यामुळे हे स्वप्न शुभ मानले जाते. स्वप्नात जर तुम्ही पॅडवर रक्त लागलेले पाहिले असेल तर याचा असा अर्थ होतो कि तुम्ही आयुष्यात काही गोष्टींमुळे अडकून गेलेले आहेत, तुम्ही त्या परिस्थितीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहात परंतु त्यात तुम्हाला अडचणी येत आहेत. तर अशावेळी तुम्हाला शुभ संकेत मिळतात की लवकरच या गोष्टी तुमच्या जीवनातून निघून जातील आणि तुम्ही या सर्व अडचणीतून मोकळे व्हाल.
स्वप्नात जर तुम्ही मासिक पाळीमुळे पोटात दुखत असेल असे स्वप्न पाहिले असेल तर तुम्ही एखाद्या गोष्टीच्या टेन्शनमध्ये आहात किंवा तुम्हाला एखादी गोष्ट मनातल्या मनात खात असेल तर हे स्वप्न असे सांगते की तुम्ही या सर्व गोष्टीमधून बाहेर निघले पाहिजे.
तात्पर्य
Swapnat Masik Pali Yene या स्वप्नाचे संकेत वाईट नसून खूप चांगले आहेत. तुमच्यासाठी हे स्वप्न शुभ असू शकते, तुमची डिलिव्हरी अगदी व्यवस्थित होऊ शकते आणि तुमच्या जीवनात कसल्याहि अडचणि येणार नाहीत, तुमच्या जीवनातून साऱ्या अडचणी निघून जातील आणि तुम्ही मोकळे व्हाल असे स्वप्नशास्त्र सांगते.