Swapnat Purvaj Disne हे स्वप्न आपल्यापैकी बऱ्याच लोकांना पडले असेल. हे स्वप्न बघून काहीजण घाबरले असतील तर काहीजणांना चांगले वाटले असेल परंतु या स्वप्नाचे नेमके काय संकेत आहेत ते जाणून घेणे गरजेचे आहे. एखाद्या संकटामधून बाहेर पडण्यास किंवा तुम्ही आयुष्यात एकटे आहात तेव्हा देखील स्वप्नात पूर्वज येतात, ते आपल्याला चांगले मार्गदर्शन देखील करतात. चला तर या स्वप्नाचे नेमके काय संकेत आहेत ते जाणून घेऊया.
Swapnat Purvaj Disne अशुभ संकेत
ज्या व्यक्तींचे अंतिम संस्कार, अंतिम क्रिया पूर्ण रीती रिवाजाजानुसार झाले नसल्यास आपले पूर्वज स्वप्नात दिसतात. जर आपल्या पूर्वजांची एखादी इच्छा अपूर्ण राहिली असेल तर ते स्वप्नात दिसतात. जर आपले पूर्वज स्वप्नात आजारी आहेत असे दिसल्यास असे समजावे की त्यांच्या आत्म्यास शांती मिळालेली नाही आहे. जर स्वप्नात पूर्वजांच्या आत्म्यास शांती न मिळाल्याचे संकेत मिळाल्यास पंडित किंवा गुरुजींचा सल्ला घेऊन श्राद्ध व पिंडदान करावे.
स्वप्नात जर पूर्वज तुमच्यावर रागावलेले दिसत असतील किंवा रडताना दिसत असतील तर हे स्वप्न अशुभ मानले जाते. तुमच्यावर एखादे संकट येणार आहे किंवा तुम्ही एखाद्या अडचणीत पडणार आहे असे त्याचे संकेत असते. स्वप्नात पूर्वज तुमच्या पायाजवळ उभे आहेत किंवा तुमच्या पायाजवळ बघत असतील तर हे स्वप्न अशुभ मानले जाते तुमच्यावर एखादे संकट येणार आहे असे त्याचे संकेत असते. स्वप्नात जर पूर्वज तुम्हाला दिसत असतील परंतु ते तुमच्याशी काही बोलत नसतील तर हे स्वप्न चांगले नसून तुम्ही एखादे चुकीचे काम करत आहात असा त्याचा अर्थ होतो. या स्वप्नामुळे तुमच्या कुटुंबात वादविवाद होतील किंवा परिवारामध्ये कटूपणा येईल असे संकेत मिळते.
Swapnat Purvaj Disne शुभ संकेत
पितृपक्षात जर तुम्हाला मृत्यू पूर्वज दिसत असतील किंवा तुमचे आई-वडील दिसत असतील तर हे स्वप्न चांगले मानले जाते. स्वप्नात जर आपले पूर्वज आनंदी दिसले अथवा हसताना दिसले तर हे स्वप्न सुद्धा चांगले असून त्यांचा आशीर्वाद आपल्यावर आहे असे त्याचे संकेत असते. पूर्वज स्वप्नात खुश असल्याचे दिसल्यास तो शुभ संकेत मानला जातो याचा अर्थ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत असे त्याचे संकेत असते. स्वप्नात जर पूर्वज तुमच्याशी बोलत असताना दिसले किंवा तुम्हाला काहीतरी महत्त्वाची माहिती दयायची आहे असे त्याचे संकेत असते. तुमची एखाद्या व्यक्तीकडून फसवणूक होणार आहे किंवा तुमचे काही चुकत असेल तर त्या संदर्भात तुम्हाला सावधान करण्याचे काम हे स्वप्न करते.

जर जिवंत व्यक्ती स्वप्नात दिसली तर त्या व्यक्तीचे आयुष्य वाढण्याचे संकेत मिळतात. जर स्वप्नात पूर्वज तुमच्या डोक्यावर हात फिरवत असतील तर असे समजावे ते तुमच्यावर खुश आहेत. जर घरातील गर्भवती महिलेच्या स्वप्नात पूर्वज दिसले तर असे समजावे की त्यांना याच घरात पुनर्जन्म घ्यायचा आहे. स्वप्नामध्ये पूर्वज जर तुम्हाला काहीतरी देत आहेत किंवा तुमच्या डोक्यावर हात ठेवत असतील तर हे स्वप्न तुमच्यावर त्यांचा आशीर्वाद आहे असे स्वप्न शास्त्र सांगते आणि ते तुमच्या कर्माशी समाधानी आहेत असा त्याचा अर्थ होतो.
तात्पर्य
स्वप्नात पूर्वज दिसणे या स्वप्नाचे शुभ आणि अशुभ असे दोन्ही संकेत आहेत. शुभ संकेत म्हणजे तुम्हाला जर ते स्वप्नात आनंदी दिसत असतील तर त्यांचा तुमच्यावर आशीर्वाद आहे आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असा त्याचा अर्थ होतो. स्वप्नात पूर्वज तुमच्याशी बोलत असतील तर तुमचे एखाद्या व्यक्तीकडून फसवणूक होणार आहे त्यासाठी ते तुम्हाला सावध करत आहे असे त्याचे संकेत असते.
या स्वप्नाच्या अशुभ संकेत म्हणजे जर तुमच्या पूर्वजांची अंतिम क्रिया पूर्ण झाली नसेल म्हणजे रीती रिवाजानुसार नसेल झाली तर ते तुम्हाला स्वप्नात नेहमी दिसत असतील. जर ते स्वप्नात तुम्हाला आजारी दिसत असतील किंवा रडताना दिसत असतील तर त्यांच्या आत्म्यास शांती नाही लाभली आहे असे त्याचे संकेत असते. ते तुमच्यावर रागावलेले दिसत असतील तर तुमच्यावर एखादे संकट येणार आहे असा या स्वप्नाचा अर्थ असतो.