Swapnat Swatache Lagn Disane आणि ज्यांना लग्न करायचंय अशांना जर ही स्वप्न पडली तर त्या स्वप्नांना काही विशिष्ट अर्थ असू शकतो तो काय आहे चला आपण जाणून घेऊया. मनी वसे ते स्वप्नी दिसे अस म्हणतात. लग्नाळू मुलांना किंवा मुलींना विवाह संकल्पनेवर आधारित स्वप्न पडत असणार यात काही शंकाच नाही. पण स्वप्न ज्योतिष शास्त्रात दिलेल्या ठोकताळ्यानुसार असतील तर त्याला काहीतरी अर्थ असू शकतो. त्याचा अर्थ असाही असू शकतो की लवकरच तुम्हाला हळद लागणार आहे अर्थात तुमचं लवकरच लग्न होणार आहे.
Swapnat Swatache Lagn Disane शुभ संकेत
जस की स्वप्नात इंद्रधनुष्य दिसणं शुभ मानल जात तसेच वैवाहिक आयुष्य सुखात जाणार यासंबंधीचा हा संकेत आहे तसेच मोरपीस दिसण सुद्धा शुभ असत. इतकच कशाला स्वप्नात आनंदाने स्वतःलाच नाचताना पाहणे हा सुद्धा लवकर लग्न होण्याचा संकेत आहे. असं स्वप्न सुखी दांपत्य जीवनाचे प्रतीक हे मानलं जातं किंवा सोने खरेदी करत असल्याचा स्वप्न पडलं तर श्रीमंत जोडीदार मिळणार यात काही शंकाच नाही. स्वप्नात तुम्ही एखादया यात्रेत किंवा गर्दीमध्ये हरवून जात असाल तर घाबरू नका तुमचा शोध घेणारा जोडीदार लवकरच तुमचा शोध घेत तुमच्या पर्यंत येतोय असे त्याचे संकेत असते.
स्वप्नात जर नवरी रडताना पाहिली असेल तर हा शुभ संकेत असतो. याचा अर्थ असा होतो की लवकरच तुमची एखादी इच्छा पूर्ण होणार आहे. जर तुम्ही एखादया प्रोजेक्टवर काम करत असाल तर त्यात तुम्हाला यश नक्की मिळणार आहे असे स्वप्नशास्त्र सांगते.
Swapnat Swatache Lagn Disane अशुभ संकेत
तुम्ही विवाहित आहात आणि तुम्हाला तुमचा परत विवाह होताना स्वप्न पडले असेल तर हे स्वप्न अशुभ असून पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतो असे याचे संकेत असते. विवाह इच्छुक मंडळींनी स्वप्नात कोणाची तरी प्रेतयात्रा किंवा शवयात्रा पाहिली तर त्यांचं वैवाहिक जीवन कलहपूर्ण असू शकते. स्वप्नात कोणाशी तरी टोकाची भांडण होत असताना दिसली आणि अशी स्वप्न वारंवार दिसली तर अशा लोकांचं वैवाहिक जीवन धोक्यात असू शकत. स्वप्नात स्वतःला कामात गडून गेलेले पाहिलं असेल तर तुमचं वैवाहिक जीवन खडतर पण सुखमय होईल. स्वप्नात तुमचा बघण्याचा कार्यक्रम दिसत असेल पण बघायला आलेली व्यक्तीच आठवत नसेल तर काळजी करू नका तुम्हाला मनपसंत जोडीदार मिळणार असा याचा अर्थ आहे.

लग्नाच्या गाठी ब्रह्मदेवाने स्वर्गात बांधलेल्या आहेत. त्या कधी कशा कुठे बांधल्या जातील हे त्यालाच माहिती. स्वप्नांमध्ये मिळालेले संकेत आपल्याला दिलासा देतात हे नक्की. बाकी आपले चारित्र्य, व्यक्तिमत्व, स्वभाव यावरच आपला जोडीदार कोण असेल हे ठरतं. जर तुमचं लग्न लवकर व्हावा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कुलदेवतेची सेवा करा तुमच्या कुलदेवतेच्या मंत्राचा जप करा किंवा एखादा उपवास करा किंवा कुलदेवतेसाठी काही ना काही तरी सेवा करा ज्यामुळे तुमचं लग्न लवकरच जमेल. एखादया स्वप्नात जर तुम्ही नवरा नवरी सात फेरे घेताना पाहिले असेल तर हे स्वप्न अशुभ असून येणाऱ्या काळात तुम्हाला तुमच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होणार आहे असे त्याचे संकेत असते.
तात्पर्य
Swapnat Swatache Lagn Disane या स्वप्नाचे शुभ आणि अशुभ असे दोन्ही संकेत आहेत. या स्वप्नाचे शुभ संकेत म्हणजे तुम्हाला समोरून तुमचा जोडीदार शोधत येऊ शकतो. तुम्हाला कामात यश मिळेल, ज्या काही प्रोजेक्टवर तुम्ही काम करत आहात त्यात तुम्ही यशस्वी व्हाल असे स्वप्नशास्त्र सांगते. या स्वप्नाचे अशुभ संकेत म्हणजे पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतात, वैवाहिक जीवन तुमचे खराब होऊ शकते, तुमच्या कामांमध्ये तुम्हाला अडथळे निर्माण होतील असे अशुभ संकेत या स्वप्नातून मिळते.