Swapnat Tulas Disne in Marathi | स्वप्नात तुळस दिसणे

Swapnat Tulas Disne हे स्वप्न आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी पाहिले असेल. तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य आहे. याचे नित्य पूजन केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीचे प्राप्ती होते. भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताच भोग अथवा प्रसाद स्वीकार करत नाही. भगवान श्रीकृष्ण सांगतात जो मनुष्य तुळशीची नित्य पूजा करतो त्याच्यावर कधीच कोणत संकट येत नाही. जो नित्यरूपाने तुळशीची पूजा करतो तो सर्व आजारांपासून लांब राहतो. तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याचे अद्भुत शक्ती आहे. तुळशीचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट, सर्व प्रकारची वाईट नजर तसंच नकारात्मक शक्तीचा नाश होतो आणि आपल्या घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो. ब्रह्मविवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप देवी वृंदाचा अवतार मानले गेले आहे म्हणूनच घरात दुसरे कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप नक्कीच असावे.

Swapnat Tulas Disne शुभ संकेत

ब्रह्मपुराणानुसार आपल्या दारात लावलेले तुळशीचे रोप नकारात्मक ऊर्जेचा नाश तर करतेच पण त्याचबरोबर आपल्याला काही संकेतही देते. हे संकेत आपल्या येणाऱ्या जीवनाशी निगडित असतात कारण तुळशीचे रोप वातावरणात निर्माण होणाऱ्या नकारात्मक शक्तीने शोषून घेते किंवा येणारे संकट आधीच तुळशीला माहीत होतात आणि ते आपल्याला विविध स्वरूपात संकेत देते. आपल्या घरात जर लक्ष्मीचा आगमन होणार असेल घरात सुख समृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे हे कळू शकत.

तुळशीच्या शेजारी जर छोटे छोटे दुसरे रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात खूप आनंद येणार आहे, तुमचा व्यापार वाढणार आहे, तुम्हाला धनलाभ देखील होऊ शकतो. तुळशीचे रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींबद्दल संकेत देत असतात. तसेच तुळशीच्या रोपावर छोट फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणतीतरी मोठी इच्छा नक्की पूर्ण होणार आहे. मित्रांनो काही लोक जेवढ्या वेळेस तुळशीचे रोप लावतात तेवढ्या वेळेस ते सूकत याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात नकारात्मक शक्तीचा वास आहे ज्यामुळे तुमच्या घरात तुळशीचे रोप राहत नाही. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर वास्तुशांती, हवन किंवा सत्यनारायणाची पूजा करून घ्यावी असं म्हटलं जातं.

Swapnat Tulas Disne अशुभ संकेत

म्हणूनच तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना हे संकेत नक्कीच बघत चला. काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानकच सुकत. आपण कितीही काळजी घेतली तरी हे रोप चुकतच जात. तर हे संकेत आहे की आपल्या घरात कोणत्यातरी नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे. तुळशीचे रोप सुकल की याचा अर्थ होतो की कोणत्यातरी कारणाने आपल जास्त धन खर्च होणार आहे. म्हणूनच तुळशीचे रोप कधीच सुकू देऊ नका. स्वप्नात तुळशीची हिरवी पाने आपोआपच गळताना दिसत असतील तर तुमच्या घरी क्लेश आणि वाटणी सारख्या समस्या येऊ शकतात. घरातील आपसी संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात. असं होत असल्यास विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचं असेल तर रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावा.

आपण असेही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ काळ्या मुंग्या जमा होतात याचा अर्थ असा होतो की कोणी बाहेरचा व्यक्ती तुमच्या घरात विपत्ती आणणार आहे. कोणत्यातरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.

तात्पर्य

तुळशिला आपल्या हिंदू धर्मात फार महत्त्व आहे. त्यामुळे तिची आपण पूजा करतो. या स्वप्नाचे शुभ संकेत म्हणजे आमच्या घरातील नकारात्मक शक्ती निघून जाऊ शकते, तुमच्या घरी लक्ष्मी येऊ शकते, तुमच्या घरात सुख समृद्धी येईल असे शुभ संकेत असते. या स्वप्नाचे अशुभ संकेत म्हणजे तुमच्यावर एखादे मोठे संकट येऊ शकते, संपत्तीमध्ये तुटवडा भासेल, घरात भांडणे होतील, परिवाराशी संबंध खराब होऊ शकतात असे या स्वप्नाचे अशुभ संकेत आहेत.

Share now

Leave a Comment