Swapnat Tulsi Disne in Marathi | स्वप्नात तुळशी दिसणे

Swapnat Tulsi Disne हे स्वप्न आपल्यापैकी बऱ्याच लोकांना पडले असेल. पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य आहे याचे नित्य पूजन केल्याने व्यक्तीला सुख, समृद्धीची प्राप्ती होते. भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे. तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताच भोग अथवा प्रसाद स्वीकार करत नाहीत. भगवान श्रीकृष्ण सांगतात जो व्यक्ती तुळशीची पूजा करतो त्याच्यावर कधीच कोणते संकट येत नाही. जो नित्य रूपाने तुळशीची पूजा करतो तो सर्व आजारांपासून लांब राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याचे अद्भुत शक्ती आहे. तुळशीचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट, सर्व प्रकारची वाईट नजर तसंच नकारात्मक शक्तीचा नाश होतो.आणि आपल्या घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो.

Swapnat Tulsi Disne शुभ संकेत

ब्रह्मविवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप देवी देवतांचे अवतार मानले गेले आहे म्हणूनच त्याला दुसरे कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप नक्कीच असावे. ब्रह्मपुराणानुसार आपल्या दारात लावलेले तुळशीचे रोप नकारात्मक ऊर्जेचा नाश तर करतेच पण त्याचबरोबर आपल्याला काही संकेतही देते.हे संकेत आपल्या येणाऱ्या जीवनाशी निगडित असतात कारण तुळशीचे रोप वातावरणात निर्माण होणाऱ्या नकारात्मक शक्तीला शोषून घेते किंवा येणारे संकट आधीच तुळशीला माहीत होतात आणि ते आपल्याला विविध स्वरूपात संकेत देते. आपल्या घरात जर लक्ष्मीच्या आगमन होणार असेल घरात सुख समृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे हे कळू शकत.

म्हणूनच तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना हे संकेत नक्कीच बघत चला आज आपण जाणून घेणार आहोत याच संकेतांविषयी. तुळशीच्या शेजारी जर छोटे छोटे दुसरे रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात खूप आनंद येणार आहे. तुमचा व्यापार वाढणार आहे आणि तुम्हाला धनलाभही होऊ शकतो.

Swapnat Tulsi Disne अशुभ संकेत

मित्रांनो काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानक सुकत आपण कितीही काळजी घेतली तरी हे रोप सुकतच जात. तर हे संकेत आहे की आपल्या घरात कोणत्यातरी नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे. तुळशीचे रोप सुकल की याचा अर्थ होतो की कोणत्यातरी कारणाने आपलं जास्त धन खर्च होणार आहे म्हणूनच तुळशीचे रोप कधीच सुकू देऊ नका.

तुळशीची हिरवेपणा आपोआपच गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश आणि वाढणी सारख्या समस्या येऊ शकतात. घरातिल आपसी संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात. असं होत असल्यास विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचं असेल तर रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावा. तुळशीचे रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींबद्दल संकेत देत असतात आपण असे बघितले असेल की तुळशीच्या रोपाजवळ काळा मुंग्या जमा होतात याचा अर्थ असा होतो की कोणी बाहेरच्या व्यक्ती तुमच्या घरात विपत्ती आणणार आहे.

कोणत्यातरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते तसंच तुळशीच्या रोपावर छोटं फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणतीतरी मोठी इच्छा नक्की पूर्ण होणार आहे मित्रांनो काही लोक जेवढ्या वेळेस तुळशीचे रोप लावतात तेवढ्या वेळेस ते सुकत याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात नकारात्मक शक्तीचा वास आहे. ज्यामुळे तुमच्या घरात तुळशीचे रोप राहत नाही. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर घराची वास्तुशांती, हवन किंवा सत्यनारायणाची पूजा करून घ्यावी असे म्हटले जाते.

तात्पर्य

तुळस आपल्या धर्मात देव म्हणून पुजली जाते त्यामुळे त्याचे संकेत हे आपल्या आयुष्यात चांगले प्रतिसाद देते. Swapnat Tulsi Disne यामुळे तुम्हाला त्याचा लाभ होऊ शकतो आणि तुमच्या परिवारामध्ये सुख समृद्धी आणि शांती लाभू शकते.

Share now

Leave a Comment