Swapnat Zad Disne | स्वप्नात झाड दिसणे

आज आपण Swapnat Zad Disne या दुनियेत प्रवेश करणार आहोत. एखाद्या प्रसंगाचे चलचित्रण पाहण्याऐवजी किंवा हुबेहूब प्रसंग स्वप्नात घडताना पाहणे यापेक्षा काही महत्त्वाची प्रतीके चिन्हे स्वप्नात दिसली तर त्या प्रतिकांचा, त्या चिन्हांचा आपण अर्थ कसा लावायचा ते पाहूया. फळझाडे ज्या वृक्षांना सामान्यपणे उपयोगी फळे लागतात अशा वृक्ष्यांच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत.

Swapnat Zad Disne अशा वृक्षांच्या विषयी या फळझाडांच्या विषयी जी स्वप्न आपल्याला पडतात त्या फळांची सूचकता आणि त्या फळझाडांची चिन्हे, प्रतीके काय आहेत. त्यापासून पडणारे स्वप्ने आणि त्यांची सूचकता काय असेल हे आपण जाणून घेणार आहोत. फळझाडे कशाची प्रतिक्रिया आहेत व अशा स्वप्नातून कोणता अर्थ काढता येतो ते पाहूया किंवा स्वप्नात येणारी ही फळे फळझाडे काय दर्शवतात ते पाहूया.

वटवृक्षाचे झाड स्वप्नात दिसणे

आपल्या स्वप्नात जर वटवृक्ष दिसला वडाचे झाड किंवा त्यावर आपण चढलेले बसलेले दिसल्यास येणाऱ्या आयुष्यात आपल्याला कोण्या भल्या माणसाचा आधार मिळणार आहे तसेच वटवृक्षावरून आपण पडल्याचे दिसल्यास आपणास आयुष्यात येणाऱ्या संकट समयी आपल्यापासून लोक दूर जातील व वडाचे झाड पडलेले किंवा एखादी फांदी तुटलेले स्वप्नात दिसल्यास आपल्याला आधार देत असलेल्या व्यक्तीला नुकसान होणार किंवा आपला आधार आपल्यापासून दुरावणार अशी सूचकता या स्वप्नातून दर्शवते.

पिंपळाचे झाड स्वप्नात दिसणे | Pimplache Swapnat Zad Disne

 पिंपळाचा वृक्ष स्वप्नात दिसल्यास आतून एखाद्या धार्मिक कृत्य होण्याचे हे शुभ संकेत आहे. पिंपळ हा  हिंदू धर्मातील धार्मिक व पुण्यशील असा वृक्ष समजला जातो. पिंपळाच्या झाडाजवळ किंवा झाडाखाली उभे असल्याचे स्वप्नात दिसल्यास परमेश्वराची कृपा होण्याचे व एखादी धर्म संस्था अथवा पंथ, देवस्थान अथवा देवतुल्य मोठ्या पुण्यमान व्यक्तीचा आपल्याला आधार मिळण्याचे हे स्वप्न शुभ संकेत देते.

नारळाचे झाड स्वप्नात दिसणे | Narlache Swapnat Zad Disne

यानंतर पाहूया नाळाच्या स्वप्नात दिसल्यास मित्रांना नारळ अथवा श्रीफळ याला आपले भारतीय संस्कृतीत मानाचे स्थान असल्याने असे स्वप्न पडल्यास आपल्यालाही मान व तसेच उच्च पद मिळण्याचा शुभ संकेत या स्वप्नातून पहावयास मिळतो.

आंब्याचे झाड स्वप्नात दिसणे | Ambyache Swapnat Zad Disne

आंब्याचे झाड फळांना लखडलेले दिसल्यास धनप्राप्ती व इच्छित फलप्राप्ती होण्याचा शुभ संकेत अशा स्वप्नातून पहावयास मिळतो. पण फळ नसलेल्या आंब्याचे झाड स्वप्नात दिसल्या हातून नवीन कार्य होण्याचे तसेच त्या झाडाला मोहर लागला असल्यास हाती घेतलेल्या कार्यात यश तर येणारच तसेच नवीन कार्य तडीत जाणार असल्याचे कळते.

चिंचेचे झाड स्वप्नात दिसणे

स्वप्नात जर चिंचेचे झाड अथवा चिंचा दिसल्यास उत्तम प्रकृती व दीर्घायुष्य तसेच शीर तरुण वृत्ती लाभणार असल्याचा शुभ संकेत हे स्वप्न देते. तसेच या चिंचेच्या झाडावरून आपण पडल्यास अथवा या झाडाची फांदी तुटल्याचे स्वप्न दिसल्यास प्रकृती ढासळण्याचा संकेत जाणवतो. प्रकृतीच्या थोड्याशा तक्रारी जाणवतील.

शेवग्याचे झाड स्वप्नात दिसणे

शेवगा शेवग्याच्या शेंगा ज्याला आपण म्हणतो शेवगा उष्णता वाहक असल्याने मनात ऊर्जेची वाढ होणे हे शुभ लक्षण मात्र उष्णताजन्य वाद व्याधींचा त्रास शरीरास जाणवेल असा संकेत यातून मिळतो.

केळीचे झाड स्वप्नात दिसणे

स्वप्नात केळीच्या झाडाला केळीचा घड व केळ फुल लागल्याचे दिसल्यास नवीन गोड बातमी ऐकायला मिळणार असे समजावे. स्वप्नात केळीचे झाड घडासहित दिसल्यास हातून कल्याणकारी कार्य होणार दुसऱ्यांना आपल्या हातून मदत होणार आणि त्याला त्याचे यश हे मिळणार असा शुभ विशाल कार्याचा संकेत या स्वप्नातून मिळतो.

फणसाचे झाड स्वप्नात दिसणे

फणस व फणसाचे झाड स्वप्नात दिसल्यास एखाद्या गंडांतर व खोटा आरोप होण्याचा तसेच विश्वासघात होण्याचा संभव असल्याचे संकेत यातून मिळतात. थोड्याशा कष्टानंतर चांगले दिवस येण्याचे ही प्रतीके स्वप्न दर्शवते.

चंदनाचे झाड स्वप्नात दिसणे

चंदनाचे झाड दिसल्यास अशा व्यक्तीला मान, विद्वत्ता प्राप्त होईल तसेच धार्मिक कार्यातून नेतृत्व करण्याची संधी चालून येण्याचा तसेच दुसऱ्याच्या कामी मदतीसाठी धावून जावे लागणार व ती मदत कामी येणार असा शुभ संकेत यातून मिळतो.कारण चंदनच मुळात झिजतो तो दुसऱ्याला सुख व आनंद देण्यासाठी त्यामुळे चंदनाचे झाड स्वप्नात आल्यास आपले आयुष्य कृतार्थ झाले असे समजावे. कारण आपल्या हातून समाजाची, अथवा व्यक्तींची सेवा घडणार असल्याचे पुण्य संकेत असे स्वप्न दर्शवते.

उंबराचे झाड स्वप्नात दिसणे

उंबराचे झाड स्वप्नात येणे हे भाग्याचे लक्षण समजावे. उंबराच्या झाडात देवता राहत असल्याने असे स्वप्न आपला भाग्योदय जवळ असलेल्या तसेच धार्मिक कार्यासाठी तीर्थाटन होणार असल्याचा संकेत हे स्वप्न दर्शवते.

पपईचे झाड स्वप्नात दिसणे

पपईचे झाड स्वप्नात आल्यास थकवा जाणवेल व प्रकृतीच्या तक्रारी उद्भवण्याचा संभव असतो.

बोराचे झाड स्वप्नात दिसणे

स्वप्नात बोराचे झाड दिसणे अथवा बोर दिसणे हे धनप्राप्तीचे व आरोग्य संपन्नतेचे सूचक आहे. कारण  बोराला तारुण्य देवता म्हणून सर्व धर्मीयांत पूजले जाते यामुळे ठणठणीत प्रकृती व आजारपणातून वा शारीरिक त्रासातून मुक्तता मिळणार असल्याचा शुभ संकेत आपणास मिळतो. कारण बोराचे झाड हे तारुण्य व उत्साहाचे प्रतीक समजले जाते.

लिंबाचे झाड स्वप्नात दिसणे

लिंबाचे झाड स्वप्नात दिसणे हे शुभ सूचक आहे. कारण लिंबाचा पाला आरोग्यवर्धक व नाविन्य तेचे प्रतीक समजला जातो त्यामुळेच गुढीपाडव्याला आपण नवे वर्ष साजरे करताना लिंबाचे डहाळे वापरतो तसेच लिंबाचा मोहर चांगल्या आरोग्याचे प्रतीक मानला जात असल्याने लिंबाचे झाड पाने फुले स्वप्नात दिसल्यास नवीन कार्यतडीत जाणार मात्र लिंबाची फांदी तुटल्याचे व त्याच्या सावलीत आपण उभे असल्याचे किंवा हे झाड पडल्याचे दिसल्यास कुटुंबात प्रकृतीच्या समस्या वाढणार अशी सूचकता जाणवते.

स्वप्नात पळसाचे झाड दिसणे

स्वप्नात फुलांनी भरलेले पळसाचे झाड दिसल्यास संपन्नतेचे सूचक समजावे मात्र पळसाच्या झाडावर आपण चढत असलेले व बसलेले किंवा हे झाड पडताना दिसल्यास मूत्रजन्य विकार उद्भवण्याचे संकेत हे स्वप्नदर्शक. स्वप्नात कोणतेही झाड पानाने बहरलेले तसेच हिरवेगार दिसल्यास प्रेमात यश व कुटुंबात स्नेह वाढण्याचे संकेत मिळतात. व कोणतेही झाड पानविरहित दिसल्यास फसवणूक होण्याचे व त्रासाचे चिन्ह दर्शवते.

 नारळाच्या झाडाला पान नसणे फांदी नसणे हे आपण नेतृत्वाला मुकण्याचे, आंब्याच्या झाडाला पान नसणे म्हणजे द्रव्य हानी आणि लिंबाचे झाड पान विरहित दिसल्यास प्रकृतीच्या तक्रारी उदभवणे, चंदनाचे झाड पान वरील दिसल्यास आपल्या कार्याचा सेवेचा सदुपयोग होणार नसल्याचे असे पानविरहित झाडापासून संकेत आपल्याला जाणवतात. तसेच कोणते झाड कापलेले, तोडलेले, पडलेले दिसल्यास आर्थिक व कौटुंबिक नुकसानीचे संकेत दर्शवतात. आणि मानहानी होण्याचेही सूचकता यातून आपल्याला जाणवते.

तात्पर्य

बंधू आणि भगिनींनो आज आपण सर्वसामान्य वृक्ष, फळझाडे हि कशाची प्रतीके आहेत .अशा प्रत्येकात्मक स्वप्नांचा अर्थ व सूचकता पहिली जेणेकरून या सूचकतेमुळे आपल्याला भावी आयुष्यात त्यापासून काय शिकता येईल हे समजते.

Share now

Leave a Comment